 |
 |
उल्हास नदी पाणी नियोजन सन २००९ अंतर्गत मिरा - भाईंदर महापालीका क्षेत्रात शासनाने १ डिसेंबर २०१० पासून लागू केलेली २० टक्के पाणी कपात रद्द करण्याचे आदेश जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी आज दिले. खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या प्रयत्नाने ही पाणी समस्या दूर झाल्याने मिरा - भाईंदरकरांना नववर्षाची जणू खा. नाईक यांच्याकडून अनोखी भेट मिळाली.
मिरा - भाईंदरमधील पाणी कपात रद्द करण्याबाबत आज मंत्रालयात खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत श्री तटकरे यांनी संबंधित अधिकाèयांना विशेष बाब म्हणून पाणी कपात रद्द करण्याबाबत आदेश दिले.
|
मिरा - भाईंदरची २० टक्के पाणीकपात रद्द करण्याबाबत खासदार नाईक यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नाने ही पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. या प्रसंगी भाईंदरचे आमदार गिल्बर्ट मेंडोसा, महापौर तुळशीदास म्हात्रे, उपमहापौर जयंत पाटील, आयुक्त शिवमूर्ती नाईक, विरोधी पक्षनेते प्रभात पाटील आदी या बैठकीला उपस्थित होते.
उल्हास नदी आणि बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठी विचारात घेऊन लघु पाटबंधारे विभागाने १ डिसेंबर २०१० पासून १५ जून २०११ पर्यंत २० टक्के पाणीकपात ठाणे जिह्यातील सर्व महानगरपालिकांना सुरु केली आहे.
ठाणे जिह्यातील सर्व महापालिकांना २ ते ३ स्त्रोतातून पाणी उपलब्ध होते. मात्र मिरा - भाईंदर शहरात पाणी पुरवठ्याचा एकच स्त्रोत असल्याने एक दिवस पाणी कपात व पुढील २ ते ३ दिवस कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे.
मिरा - भाईंदर शहरातील नागरिकांना सध्या ३८ ते ४० तासांनी पाणी मिळते. पाणी कपातीमुळे आता हे पाणी ७० ते ७२ तासांनी म्हणजेच ३ दिवसांनी व तेही कŸमी दाबाने मिळते.
पाणी कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. नागरिकांनी अनेक आंदोलने केली. लोकल टड्ढेन व बस गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली. महापालिकेवर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे मिरा - भाईंदरमध्ये तणावपूर्ण परिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मिरा - भाईंदरची पाणीकपात तत्काळ रद्द कŸरुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती समस्त मिरा - भाईंदरवासियांतर्फे खासदार संजीव नाईक यांनी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांना केली. ही विनंती मान्य करुन जलसंपदा मंत्री श्री. तटकरे यांनी तत्काळ पाणी कŸपात रद्द करण्याचे आदेश दिले.
राष्टड्ढवादीचे गटनेते भगवती शर्मा, नगरसेवक धुवकिशोर पाटील, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठोमरे, चीफŸ इंजिनियर श्री. सोनजे, सिटी इंजिनियर के. लाला, इंजिनियर एस. वाघ, कार्यकारी अभियंता श्री. ठाणेदार, श्री. सेठिया, उपअभियंता नितीन आसलकर बैठकीस उपस्थित होते.
|
|
 |
|
|
 |