कोट्यवधी रूपयांचा ठाण्यातून महसूल मिळूनही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या समस्येकडेलक्ष देत नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत पुढील दोन महिन्यात समस्यांचे निराकरण न केल्यास वेळप्रसंगी खासदार नात्याने रस्त्यावर उतरून प्रवाशांसाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा ठाण्याचे खासदार डॉ. संजीव नाईक यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
‘खासदार आपल्या भेटीलाङ्क या उपक्रमांतर्गत ठाण्याचे खासदार डॉ.संजीव नाईक यांनी आज (मंगळवारी) ठाणे रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. खा. डॉ. नाईक यांनी रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर प्लॅटफॉर्म क्र. २ वर सूचना पत्रकातून रेल्वेचा प्रवास करताना भेडसावणाèया अडचणी तसेच रेल्वे स्थानकातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी ८४१ प्रवाशांनी ठाणे, कल्याण, वाशी या मार्गावरील विविध समस्यांची कैफीयत खासदारांपुढे मांडली. यात ज्येष्ठ नागरिक, अधिकारी वर्ग, कॉलेज विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, रेल्वे पोलीस आदींनी आपल्या समस्या खासदारांपुढे मांडून कारवाई करण्याची मागणी केली.
खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या भेटी दरम्यान कामगार नेते अशोक पोहेकर, काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, ठामपाचे नगरसेवक भरत चव्हाण, लक्ष्मण टिकमानी, ओबीसी सेलच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, प्रभाकर सावंत, दिनेश पाटील, ठाणे रेल्वे स्टेशनचे प्रबंधक ए.टी. मॅथ्यू, मुख्य विभागीय डीसीएम जगदीश प्रसाद, गर्क, ठाणे विभाग अधिकारी संजय गुप्ता,ए.एस. मान, आरपीएफचे अधिकारी आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी खा. डॉ. नाईक वरचेवर ठाणे रेल्वे स्थानकाला भेट देत असतात. संसदेचे अर्थसंकल्पीप अधिवेशन या महिन्यात होत असून त्या अनुषंगाने प्रवाशांच्या अपेक्षा खा. डॉ. नाईक यांनी आज प्रत्यक्षात जाणून घेतल्या. खा. डॉ. नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मागील तीन वर्षात रेल्वे प्रवाशांना १२ डब्यांच्या रेल्वेसेवेबरोबरच इतर सुविधांची पूर्तता होत आहे. लवकर ऐतिहासिक नोंद असणाèया ठाणे रेल्वेस्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी खा.डॉ. नाईक यांचे प्रयत्न सुरू आहेत.
आजच्या भेटी दरम्यान खा. डॉ. नाईक यांनी ठाणे पूर्वेकडील स्कायवॉक, जुना पादचारी पुल, स्टेशन परिसरातील नादुरूस्त आणि बंद पडलेली तिकीट मशिन (कूपन मशिन), इंडिकेटर, पादचारी पूल, शौचालय, स्वच्छतागृह यांची झालेली दुरावस्था रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. याविषयी अधिक माहिती देताना खा. डॉ. नाईक म्हणाले की, ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर रेल्वेला महसूल मिळत आहे. परंतु परिपूर्ण अशा सोयीसुविधा प्रवाशांना मिळत नाही. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या आम्ही निदर्शनास आज आणून दिली. ५ कोटी २५ लाखांचा निधी रेल्वे प्रशासनाला मिळूनही रेल्वे प्रशासन प्रवाशांना सोयीसुविधा का देत नाही? असा सवाल मुख्य प्रबंधक ए.टी. मॅथ्यू यांना केला. ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता सॅटीस आणि पूर्वेकडील स्कायवॉक यांना जोडणारा ६ फूटांचा रूंद जोडपूल उभारण्यासंदर्भात खा. डॉ. नाईक यांचा पाठपुरावा सुरू असून याचा आढावाही यावेळी घेतला. यावर निधी आल्याचे सांगत निविदा प्रक्रिया आगामी दीड ते दोन महिन्यात पूर्ण करून पुलाच्या कामाला सुरूवात होईल,असे रेल्वे प्रबंधकांनी स्पष्ट केले. सन २०१२पर्यंत जोडपूल मार्गी लागेल, असे डीसीएम जगदीश प्रसाद यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासन, एमएमआरडीए आणि ठामपा यांच्याकडून विविध कामांसंदर्भात होणाèया टोलवाटोलवीवर प्रकाश टाकत या विभागाच्या प्रमुख अधिकाèयांशी बैठक लावून प्रवाशांच्या व्यथा त्यांच्या पुढे मांडणार असल्याचे खा. डॉ. नाईक म्हणाले. ठाणे स्थानकातील असणारी अस्वच्छता, बंद तिकीट मशिन आणि खिडक्या, बंद इंडिकेटर याबाबत प्रवाशांकडून दाखल झालेल्या तक्रारीनुसार रेल्वे अधिकाèयांना धारेवर धरत तात्काळ या सोयीसुविधा पुरविण्याची मागणी खा. डॉ. नाईक यांनी केली. खासदारांच्या या भेटी दरम्यान सूचना पत्रकातून आलेल्या समस्या प्रत्यक्ष सूचनाकर्ते यांच्या समवेत खासदारांनी रेल्वेच्या अधिकाèयांकडे मांडल्या. ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म क्र.१ हा महत्त्वाचा